नारायण राणेंचा नाराजी सूर मावळला

cm
कोल्हापूर – पंधराच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चव्हाणांवर टीकेचा धुराळा उडवलेल्या राणेंनी मात्र आपला पवित्रा चक्क बदलला आहे. राणेंनी चव्हाणांची स्तुती केली आहे. कोल्हापुरात काल अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. य़ा अधिवेशनात राणेंसह मुख्यमंत्री चव्हाण, आणि विरोधीपक्ष नेते विनोद तावडे हेही उपस्थित होते.

नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षपद दिल्याबद्दल राणेंनी चक्क मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून राणेंची नाराजी दूर झाली की, त्यांना काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र काल कोल्हापूरात त्याच राणेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती करताना मराठा आरक्षणावरून आभारही मानले आहेत. कालच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते शेजारी शेजारी बसले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा उपय़ोग नोकऱ्यांपेक्षा शिक्षणासाठी करण्याचा सल्ला दिला. यालाही नारायण राणेंनी दुजारा दिला आणि समितीचा अध्यक्ष केल्यामुळेच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ शकलो असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Leave a Comment