चीन राष्ट्रपती शि जिंगपिग भारत, पाक, लंकेचा दौरा करणार

xi
चीनचे राष्ट्रपती शि जिंगपिंग या महिन्याच्या अखेरी अथवा पुढील महिन्यात भारत, पाक आणि श्रीलंकेला भेट देणार आहेत. चीनी परराष्ट्र विमागातील अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही देशांशी चर्चा करून दौर्‍याच्या तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शि जिंगपिग पाकमध्ये या महिनाअखेर कांही मोठ्या प्रकल्पांची कोनशीला ठेवणार आहेत. त्यामुळे ते कदाचित प्रथम पाकिस्तानमध्ये जाऊन मग भारताला भेट देतील. गतवर्षी चीन पंतप्रधान लि क्विग यांनी पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड केली होती. चीनचे राष्ट्रपती प्रथमच भारतीय उपमहाद्विपातील देशांच्या भेटीवर येत आहेत. ब्राझील येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत भारताचे पंतप्रधान मोदी व शि जिंगपिंग यांची भेट झाली होती. त्यावेळीच त्यांच्या दिल्ली दौर्‍याविषयी चर्चा झाली होती.

श्रीलंकेला भेट देणारे शि जिंगपिंग हे पहिलेच चीनी राष्ट्रपती आहेत. चीनने पुढच्या सात वर्षात पाकिस्तानातील पायाभूत सुविधा व वीज निर्मिती प्रकल्पांसाठी ३२ अब्ज डॉलर्सची गुंतवणुक करणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच भारतात चीन चार औद्योगिक पार्कही उभारणार आहे.

Leave a Comment