चीनमध्ये भूकंप ;१७५ ठार ,१ हजार जखमी

earthquake
बीजिंग- चीनच्या युन्नात प्रांतात आलेल्या भूकंपामुळे १७५ जण ठार आणि एक हजार नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र युन्नान प्रांतात असल्याची माहिती अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्वेने दिली आहे.

भूकंपामुळे अनेक घरं ध्वस्त झाली असल्याची माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने शिन्हुवा या सरकारी वृत्तसंस्थेला दिली. जाओटॉन्ग प्रांताच्या क्वियाजिया भागात सर्वाधिक जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.

या भागात गेल्या १४ वर्षांतला हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सीसीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं आहे.

Leave a Comment