ऑक्सिजन तयार करणारे कृत्रिम पान तयार

pane
लंडन – ब्रिटन रॉयल कॉलेज ऑफ आर्टस मधील संशोधक जिलन मेलचियोरी यांनी ऑक्सिजन तयार करणारे जगातले पहिले कृत्रिम पान तयार केले आहे. ही सिथेटिक बायोलॉजिकल पाने जिवंत झाडांप्रमाणे ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू तयार करू शकतात. याचा उपयोग अंतराळातही ताज्या हवेचा लाभ मिळविण्यासाठी होऊ शकणार आहे.

आपल्याला माहिती आहे की झाडे कार्बन वायू शोषून घेतात आणि प्राणवायू बाहेर टाकतात. त्याप्रमाणे ही कृत्रिम पानेही ऑक्सिजन तयार करू शकतात. ही पाने कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी शोषून घेतात आणि त्यापासून ऑक्सिजन निर्माण करतात. सिल्क प्रोटीनपासून बनविलेल्या मेटि्रक्स मध्ये क्लारोप्लॉटस मिसळून ही पाने तयार केली गेली आहेत. फायबर सिल्कपासून बनलेल्या या मटेरियलमध्ये अणुंना स्थिर करण्याची अनोखी क्षमता असल्याचे संशोधनात आढळल्यानंतर हा प्रयोग करण्यात आला होता.

Leave a Comment