इंटर्नशीपने नोकरीची दारे खुली

iternship
पूर्वीच्या काळी इंटर्नशीप हा प्रकार केवळ वैद्यकीय शिक्षणालाच लागू होता. परंतु आता अनेक विद्याशाखांच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप सक्तीची झालेली आहे. ही इंटर्नशीप नेमकी काय असते याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना झालेली नाही. परंतु काही विद्यार्थी मात्र या विद्यावृत्तीच्या काळाबाबत ङ्गार गंभीरपणे विचार करत असतात. त्यांच्या दृष्टीने इंटर्नशीप हा चांगली नोकरी मिळविण्याचा राजमार्ग असतो. नाही तरी आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण साधारणत: बंद खोलीतले किंवा चार भिंतींच्या आतले असते. त्यामुळे ते शिक्षण पूर्णपणे पुस्तकी ज्ञानावर आधारलेले असते. नोकरी देणारी व्यक्ती अशा पुस्तकी ज्ञानापेक्षा त्या ज्ञानाच्या व्यवहारी वापराच्या कौशल्याला महत्व देत असते. अनेक वेळा नोकरी मागणार्‍या मुलांना असे आढळले आहे की, नोकरी देणारे मालक ङ्गार वेगळा विचार करत असतात. तुम्ही कोणत्या कॉलेजमधून पास झालेले आहात, तुम्हाला शेवटच्या वर्षाला किती मार्क मिळालेले आहेत आणि तुम्ही कोणत्या शहरातून शिकून बाहेर पडलेले आहात याला हे मालक लोक ङ्गार महत्व देत नाहीत. तुमच्या पुस्तकी ज्ञानाचे उपयोजन किंवा ऍप्लिकेशन तुम्ही कसे करत असता आणि त्या उपयोजनाचा मालकाला ङ्गायदा हाेतो की नाही याचाच ते विचार करत असतात आणि अशी आपली उपयोगिता किती आहे हे आपल्याला इंटर्नशीपमध्येच कळत असते. या काळात आपल्या पुस्तकी ज्ञानाचे उपयोजन कसे करावे, हे आपल्याला शिकता येतेच, पण त्याचबरोबर ते शिकण्या-साठी आवश्यक असलेल्या सुविधा समोर उपलब्ध झालेल्या असतात. ज्या विद्यार्थ्याला गांभीर्याने काम करायचे असते आणि चांगली नोकरी मिळवून उत्तम करीअर करायचे असते अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठी इंटर्नशीप ही एक उत्तम संधी असते. काही विद्यार्थी इंटर्नशीपला ज्या कारखान्यात किंवा उद्योगात जातात तिथे एवढे चांगले काम करून दाखवतात की त्यांना तिथेच नोकरी मिळून जाते. कारण इंटर्नशीपमध्ये त्यांनी आपली कौशल्याची झलक दाखवलेली असते. अनेक विद्यार्थी इंटर्नशीपकडे कसेबसे पार पाडायचे एक कर्मकांड म्हणून पहात असतात. परंतु होतकरू विद्यार्थी या विद्यावृत्तीकडे संधी म्हणून पहात असतात. आपल्याला ज्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करायची आहे ती इंडस्ट्री कशी चालते, हे पाहण्याची संधी, तिथल्या लोकांशी संपर्क वाढविण्याची संधी म्हणून ते इंटर्नशीपकडे पाहतात. करीअर विकसित करण्याचा तो महत्वाचा टप्पा आहे.

Leave a Comment