आयकर विभाग बनविणार नवीन डेटा बेस सेंटर

incometax
काळ्या पैशांवर अंकुश आणण्यासाठी केंद्र सरकार हाती घेत असलेल्या अनेक उपाययोजनांचा एक भाग म्हणून आयकर विभाग नवीन डेटा कें द्र बनविणार असल्याचे समजते. हे डेटा संग्रह केंद्र उत्तर भारतात असेल असेही सांगितले जात आहे. या नव्या केंद्रामुळे आयकर विभागाला व्यक्ती अथवा फर्मच्या खर्चांवर लक्ष ठेवण्यास सहाय्य होणार आहे. व्यवसायाशी संबंधित गुप्त माहिती आणि देवाणघेवाणीचे आकडे यामुळे सहजी उपलब्ध होऊ शकणार आहेत. हे केंद्र पुढील वर्षात कार्यान्वित होईल असे समजते.

नव्या केंद्रामुळे आयकर विभागाला काळा पैसा नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकणार आहे. आयकर विभागाकडे सध्या कोणत्याही व्यक्ती अथवा उद्योग कांही मोठे व्यवहार करत असतील तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पॅनकार्ड सूचना अथवा डेबिट क्रेडीट कार्ड वापरासंबंधी सूचना देणारा डेटाबेस आहे. नवीन प्रकल्पाचे नामकरण डेटा वेअरहाऊसिंग अॅन्ड बिझिनेस इंटेलिजन्स असे केले गेले असून याच्या मदतीने आयकर तपास शाखा इलेक्ट्रोनिक पद्धतीने डेटा मिळवू शकणार आहे.

Leave a Comment