राष्ट्रकुल स्पर्धा ;दोन भारतीय अधिकारयाना अटक

glassgow1
ग्लासगो – एकीकडे भारतीय खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या कामगिरीने देशाचे नाव उंचावत असतानाच, काही भारतीय अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे देशाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ ओढवली आहे. विशेष म्हणजे एक अधिकारी चक्क विनयभंग प्रकरणात तर दुसरा मद्यपान करून वाहन चालविताना सापडला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा सुरू असणाऱ्या ग्लासगो येथे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचेसरचिटणीस राजीव मेहता आणि कुस्तीचे पंच विरेंदर मलिक यांना अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.
राजीव मेहता यांना दारू पिऊन गाडी चालविल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. तर, विरेंदर मलिक यांच्यावर विनयभंगाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सोमवारी या दोघांनाही ग्लासगोतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी भारतीय व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे राजीव मेहता आणि विरेंदर मलिक राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेल्या २१५ जणांच्या अधिकृत भारतीय चमुचे सदस्य नाहीत. हे दोघेही जण एका स्पर्धेच्या ठिकाणी असणाऱ्या एका खासगी हॉटेलमध्ये उतरले होते.

Leave a Comment