माळीण दुर्घटना ; पडकई योजनेला नव्हे, गैरव्यवहाराला विरोध

malin1
मंचर : माळीण येथील दुर्घटना घडल्यानंतर पडकई योजनेबाबत मी अवाक्षर बोललो नव्हतो; मात्र तरीही विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी माझ्यावर टीका केली आहे. पडकई योजनेला नाही, तर त्यातील गैरप्रकाराला विरोध आहे. त्यामुळे माळीण दुर्घटना; तसेच पडकई योजनेबाबत सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

आढळराव पाटील म्हणाले, दुर्घटना घडली, त्यावेळी मी संसदेत होतो. घटनेची माहिती मिळताच मी ती पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सांगितली. सिंह यांना विनंती केल्यानंतर त्यांनी माळीणचा दौरा करून मदतही जाहीर केली. मी पडकई योजनेबाबत काहीही बोललो नाही. माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत आवाज उठविला. मात्र, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी माझ्यावर टीका केली. आता मात्र पडकई योजनेची चौकशी करावी, अशी मागणी मी करतो, अशी भूमिका आढळराव यांनी मांडली आहे

Leave a Comment