सॅमसंगविरोधात मायक्रोसॉफ्टची तक्रार

microsoft
सॅन फ्रन्सिस्को : सॅमसंगविरोधात अमेरिकी न्यायालयात मायक्रोसॉफ्टने तक्रार दाखल केली असून सॅमसंगवर पेटंट कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे.

जगातील स्मार्टफोन बाजारात सॅमसंगने मागील वर्षाच्या शेवटी मॉयक्रोसॉफ्टसोबत केलेल्या कराराचे पालन न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या वकिलांनी आपल्या ऑनलाईन पोस्टमध्ये सांगितले आहे. न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे, की सॅमसंग स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये वापरलेले मायक्रोसॉफ्टच्या तंत्राची नोंद करण्यास तयार नाही.

दरम्यान, सॅमसंगने सावध भूमिका घेत म्हटले आहे, की तक्रारीची सविस्तर समीक्षा केली जाईल आणि त्यानंतरच योग्य पाऊल उचलले जाईल.

Leave a Comment