राष्ट्रकुल हॉकी – भारताला सुवर्ण संधी

hockey1
ग्लासगो – भारताच्या पुरुष हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत न्यूझीलंडवर ३-२ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताची उद्या (रविवारी) सुवर्ण पदकासाठी लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय संघाने आज झालेल्या उपांत्य लढतीत अप्रतिम खेळ केला. सामन्याच्या सुरुवातीपासून २-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने अखेर ३-२ अशी आघाडी घेत विजय मिळवला. सामन्यातील १७व्या मिनिटालाच न्यूझीलंडने २-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर २७व्या मिनिटाला रुपींदर सिंग यांने पहिला गोल करुन भारताची पिछाडी कमी केली. त्यानंतर रामानंदिप सिंग याने दुसरा तर अक्षयदिप सिंग याने तिसरा गोलकरुन विजय मिळवून दिला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने अद्याप सुवर्णपदक मिळवले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणा-या अंतिम लढतीत विजय मिळवून भारताला सुवर्ण इतिहास घडवण्याची संधी आहे.

दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये भारताच्या लैइश्राम देवी हीने रौप्य पदक मिळवले.

बॅडमिंटनमध्ये महिलांच्या दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्‍पाचा यांनी किमान रौप्य पदक निश्चित केले असून त्यांनी मलेशियाच्या एल.वाय.लिम आणि एल पेई जिंग या जोडीचा २१-७, २१-१२ असा पराभव केला.

स्पर्धेत भारताने आतापर्यंत ५३ पदके मिळवली आहेत. त्यात १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि १६ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे.

Leave a Comment