मुष्टियोद्धा पिंकी जांगराच्या नावे कांस्यपदक

pinki
ग्लास्गो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अटीतटीची उपांत्य लढत भारताची महिला मुष्टियोद्धा पिंकी जांगराने गमविल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. 51 किलो वजन गटात उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्शविरुद्ध ही लढत झाली.

ऑलिम्पिक कांस्यविजेत्या एमसी मेरी कोमला या स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीवेळी पिंकीने हरविले होते. तिने वॉल्शविरुद्ध कडवी झुंज दिली. पण तिचे पंचेस प्रतिस्पर्धी उंच असल्याने अचूक बसू शकले नाहीत. आठ मिनिटांच्या चार फे-यांत कझाकच्या जजने दोघांना 38-38 गुण दिले तर कॅनडा व हंगेरीच्या जजेसनी अनुक्रमे 40-36 व 39-37 असे वॉल्शच्या बाजूने गुण दिले. पिंकीने ही लढत 0-2 अशी गमविली. पहिल्या फेरीत हरियाणाची 24 वर्षीय पिंकी फक्त एका गुणाने मागे होती. दुसऱया फेरीनंतर हे अंतर दोन गुणांचे झाले. दुसऱया फेरीमध्ये पिंकीचा उजव्या हाताचा ठोसा वॉल्शच्या चेहऱयावर बसला आणि ती रोपवर जाऊन पडली. असे असूनही फक्त एका जजने पिंकीला जास्त गुण दिले. तिसऱया फेरीनंतर मात्र पिंकी तीन गुणांनी मागे पडली. शेवटच्या फेरीत तर तीनही जजेसनी वॉल्शच्या बाजूने 10-9 असे गुण दिले.

Leave a Comment