माओवाद्यांच्या नेत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

arjun
गडचिरोली : कधीकाळी माओवादी कारवायांच्या सशस्त्र लढयाचा सुत्रधार असलेला माओवाद्यांचा नेता रवींद चम्बाला उर्फ अर्जुन आणि पत्नी रंजिताने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

तेलंगणा पोलिसांसमोर माओवाद्यांना सुरक्षा दलाच्या विरुद्ध लढाईच प्रशिक्षण देणार्‍या शाळेचा प्रमुख जहाल माओवादी रवींद्र अर्जुनने आत्मसमर्पण केले आहे. अनेक जवानांना ठार मारण्याच्या रणनितीचा सुत्रधार असलेल्या रवींद्रवर वीस लाखाचे तर त्याची पत्नी रंजीतावर सात लाखाचे बक्षीस होते.

रवींद्रच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला हादरा बसला असून माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी झालेल्या मतभेदामुळेच रवींद्रने माओवादी चळवळ सोडल्याचे मानले जाते आहे.

उल्लेखनीय म्हणजे रवींद्रने गडचिरोलीतल्या पहिल्या मिल्ट्री दलम तसेच प्लाटुन दलमच नेतृत्व केले होते. सध्या रवींद्रवर देशभरातल्या माओवाद्यांची राजधानी असलेल्या अबुझमाडमध्ये माओवाद्याना गोरील्ला पद्धतीने लढण्याचे प्रशिक्षण देणार्‍या मोबाईल मिल्ट्री प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

Leave a Comment