जगभरता सर्वशक्तिमान असूनही जगातील घटनांवर अमेरिकेचे नियंत्रण नाही – ओबामा

barack-obama
वाशिंग्टन : यूक्रेन संकट आणि गाझामध्ये सुरु असलेला हिंसाचारावर आपल्या प्रशासनाच्या परराष्ट्र नितीचा बचाव करताना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे की जगभरता सर्वशक्तिमान राष्ट्र असूनही जगभरात घडणा-या घटनांवर अमेरिका नियंत्रण ठेऊ शकत नाही.

व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ओबामा म्हणाले, अमेरिका जगभरात होत असलेल्या अनेक घटनांवर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. काय अमेरिकेने जगभरावरील आपला वचक संपविला असल्याचे पत्रकारांनी ओबामा यांना विचारले असता ओबामा म्हणाले, आमच्या कुटनितीपूर्ण प्रयत्नांना कधी कधी उशीर लागतो. ब-याचदा हे प्रयत्न सफल ठरतात. तर कधी हे प्रयत्न विफळ ठरतात. या गोष्ठी बऱयाचदा आशिया, युरोप आणि अन्य भागातही अचूक बसले आहेत.