रविंद्र जडेजा – जेम्स अँडरसन यांना आयसीसीची क्लीन चिट

anderson
लंडन – इंग्लंडच्या जेम्स अँडरसन याने भारताच्या रविंद्र जडेजाला नॉटिंगहॅम येथे झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान पॅव्हेलियनकडे परतत असताना धक्काबुक्की केली होती. आयसीसीच्या समितीने दोन्ही खेळाडूंना याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान क्लीन चिट दिली आहे.

तसेच याआधी जडेजाला करण्यात आलेला दंडही रद्द करण्यात आला आहे. सहा तासांच्या सुनावणीनंतर आयसीसीच्या समितीने हा निर्णय घेतला.

आयसीसीने २५ जुलै रोजी या प्रकरणी जडेजाला दोषी ठरवले होते आणि सामन्याच्या मानधनात ५० टक्के दंड आकारण्यात आला होता.

Leave a Comment