धातू कारखान्यात भीषण स्फोटात 65 मृत्युमुखी

china
बीजिंग : आज सकाळी चीनमधील जिएंग्सू प्रांतातील कुन्शान शहरात एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन 65 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

शांघाईच्या जवळ कुन्शाह शहरात धातू बनविण्याच्या एका कारखान्यात अचानक स्फोट होऊन 65 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता, की कामगारांचे मृतदेह 50 ते 60 फूट अंतरापर्यंत जाऊन पडले असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनीने दिली. वेगवेगळया रुग्णालयांमध्ये जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment