लालबागच्या राजाचा माळीणवासीयांना मदतीचा हात

lalbaugcha-raja
पुणे : माळीण गावच्या दुर्घटनेला दोन दिवस उलटले असले तरी अद्यापही बचाव कार्य सुरूच आहे. जमीनदोस्त झालेल्या या गावाच्या पुर्नवसनासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत.

माळीण गावासाठी 50 लाख रूपयांची मदत करणार असल्याचे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्यकारी मंगेश शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर जगातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा लालबागचा राजा देखील माळीणवासीयांच्या मदती धावला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 25 लाख रूपयांची मदत करणार असल्याचे मंडळाचे सचिव सुधीर साळवी आणि कार्यकारणी सदस्य सुगत पडेलकर यांनी सांगितले.

माळीण गावच्या मदतीसाठी मुंबईतल्या डबेवाल्यांनी एक आगळीवेगळी मदत मोहिम सुरू करणार असून डबा देताना त्यात एक चिठ्ठी ठेवण्यात येणार असून, त्यात मदतीची आवाहन करण्यात येणार आहे. तसेच यंदाची दहीहांडी फोडून त्यातून मिळणारी बक्षिसाची रक्कम माळीण गाव उभारण्यासाठी देण्यात येणार आहे.

माळीण गावाच्या पुर्नवसनासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे दहा हजार डॉलरची मदत जाहीर केली असून त्याच प्रमाणे आता महाराष्ट्र शासनाच्या मदत आणि पुर्नवसन विभागाद्वारे माळीण गावातील प्रत्येक पिडित कुटुंबाला 5 लाख रूपयांची मदत राज्यसरकारतर्फे करण्यात येणार आहे.

Leave a Comment