रोपवाटिका व्यवसाय (नर्सरी)

susery
आपल्या देशातले शेतकरी शक्यतो नियोजित पद्धतीने शेती करीत नाहीत. कारण मुळात असे नियोजन करावे लागते याची जाणीव नाही. त्याचबरोबर शेती नियोजनबद्धपणे करण्याचे ठरवले तरी त्यात अनेक अडथळे येतात. निसर्गाची अडचण असतेच, पण नियोजनबद्ध शेतीमध्ये पैशाची अडचण सुद्धा मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे कोणत्या हंगामात नेमकी कोणती पिके घ्यावीत याचे ङ्गार काटेकोर नियोजन करणे त्यांना जमत नाही. त्यामुळे ज्या पिकांची लागवड करण्याआधी काही विशिष्ट दिवस पूर्वी रोपे टाकावी लागतात त्या पिकांची लागवड करण्यासाठी आवश्यक अशी रोपे टाकलेली नसतात. कोणत्याही पिकाचे किमान दीड महिना आधी नियोजन केले तर स्वत:च स्वत:ची रोपे तयार करता येतात आणि तीच रोपे वापरून पीक घेता येते. मिरची, टोमॅटो, कांदा यांची रोपे अशी टाकावी लागतात. परंतु बहुसंख्य शेतकरी नियोजन करीत नसल्यामुळे ते दुसर्‍यांच्या रोपांवर अवलंबून राहतात. अशा शेतकर्‍यांना रोपे पुरविण्याच्या निमित्ताने काही शेतकरी नर्सरी किंवा रोपवाटिका हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायामध्ये उत्पन्न ङ्गार चांगले मिळते. कारण ऐनवेळी रोपांची मागणी करणारा शेतकरी वाट्टेल ती किंमत देऊन राेपे विकत घेत असतो.

आपली परिस्थिती सुधरून घेतलेल्या बर्‍याच शेतकर्‍यांचे निरीक्षण केले असता त्यातले बहुसंख्य शेतकरी रोपे विकून श्रीमंत झाल्याचे दिसते. असा हा शेतकर्‍यांना श्रीमंत करणारा व्यवसाय आहे. यामध्ये काही नाममात्र किंमतीचे बी आणून त्याची रोपे तयार करून ती चांगल्या किंमतीला विकता येतात. मात्र हे करताना रोप विकणार्‍यांची विश्‍वासार्हता ङ्गार महत्वाची असते. लोकांचा रोप विकणार्‍यांवर विश्‍वास असेल तर त्याच्याकडून चार पैसे जास्त घेऊन रोपे विकत घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो. कारण शेवटी शेतकर्‍याचे उत्पन्न रोपावर अवलंबून असते. तेव्हा ही विश्‍वासार्हता निर्माण करून रोपवाटिकेचा व्यवसाय करताना तो करणार्‍या शेतकर्‍यांनी चांगले बियाणे खरेदी करून शेतकर्‍यांचा ङ्गायदा होईल अशीच रोपे तयार केली पाहिजे. हा एक प्रकारे शेतकर्‍यांची चांगली सेवा करण्याचा प्रकार आहे. लोकांच्या शेतीच्या प्रगतीला आपण या मार्गाने हातभार लावू शकतो. बर्‍याच शेतकर्‍यांना मिरचीची लागवड कशी करावी माहीत असते. ते मिरचीची जोपासनाही चांगली करतात, परंतु अधिक उत्पन्न देणार्‍या आणि प्रगत बियाणांची माहिती त्यांना नसते. त्यामुळे ते स्वत:चे रोप स्वत: तयार करत नाहीत.

तेव्हा अशा शेतकर्‍यांचा गैरङ्गायदा घेऊन त्यांना कुठल्यातरी हलक्या जातीचे बी आणून त्याची रोपे महागात विकण्याची प्रवृत्ती काही रोपवाटिकांच्या मालकात दिसते. असे न करता चार पैसे जास्त लागले तरी हरकत नाही, पण चांगल्या जातीचे बियाणे आणून ती रोपे शेतकर्‍याला पुरवली पाहिजेत. भाजीपाल्याच्या रोपांची अशी विक्री करता येते. त्याचप्रमाणे ङ्गळझाडे आणि ङ्गुलझाडे यांचीही रोपे विकून चांगला पैसा कमवता येतो. त्यांची माहिती पुढच्या लेखात पाहू. असाच ङ्गळझाडांची आणि ङ्गुलांची रोपे विकण्याचाही व्यवसाय नर्सरीत केला जातो. उलट भाजीपालांच्या रोपांपेक्षा ङ्गळांची आणि ङ्गुलांची कलमी रोपे अधिक किंमतीने विकली जातात आणि त्यातून रोपांच्या विक्रीपेक्षा अधिक ङ्गायदा होतो. भाज्यांच्या रोपांपेक्षा आज खर्‍या अर्थाने ङ्गळांच्या आणि ङ्गुलांच्या रोपांची नर्सरी अधिक गरजेची ठरली आहे. आपल्या देशामध्ये ङ्गळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. असे असले तरी ङ्गळांची चांगली रोपे कोठे मिळतात, याची लोकांना माहिती नसते आणि ङ्गळांची बाग लावताना कोणत्या जातीचे रोप लावले जात आहे याला नितांत महत्व असते. कारण ङ्गळझाडाची जात निवडताना थोडी जरी चूक झाली तरी पुढे त्यातून होणारे नुकसान कायमचे ठरत असते आणि ते लाखो रुपयांचे असते.

त्यामुळे शेतकर्‍यांनी ङ्गळझाडांची लागवड करताना रोपे विकत घ्यायचे असतील तर भारी चौकशी करून ती घेतली पाहिजेत. अन्यथा केवळ शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होत असते आणि रोपवाटिका तयार करून त्याचा व्यवसाय करणार्‍या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवून उत्तम रोपे तयार केली पाहिजेत आणि त्याबाबतीत विश्‍वासार्हता निर्माण केली पाहिजे. रोपांची निवड चुकली तर आपले नुकसान होते याची जाणीव शेतकर्‍यांनाही असते. त्यामुळे चार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही, पण विश्‍वासार्ह रोपवाटिकेतून आणि तज्ञ व्यक्तीकडूनच निवड करून ते रोपे खरेदी करत असतात. रोप वाटिका करणार्‍या व्यावसायिकांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. अशीच स्थिती ङ्गुलझाडांचीही असते. ङ्गुलांना सुद्धा चांगले पैसे मिळू शकतात. कोणती ङ्गुलझाडे लावावीत, कोणत्या जातीची लावावीत याची पुरेशी माहिती अजून आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण आपल्याकडे ङ्गुलशेतीची परंपराही नाही आणि जे काही मोजके लोक ङ्गुले लावतात ते लोक परंपरेने चालत आलेल्या ङ्गुलांचीच लागवड करतात.

सध्या ङ्गुलांच्या अनेक जाती विकसित झाल्या असून त्यांना पैसेही छान मिळायला लागले आहेत. अशा ङ्गुलांची रोपे विक्री करण्याचा व्यवसाय करून हजारो लोक पैसा कमवत आहेत. परंतु हे लोक बहुतेक करून परप्रांतातले आहेत. महाराष्ट्रात ङ्गुलांची रोपे विकण्याचा व्यवसाय म्हणावा तेवढा होत नाही. या क्षेत्रामध्ये मराठी शेतकर्‍यांना ङ्गार मोठी संधी आहे. मात्र ती साधण्यासाठी ङ्गुलझाडे आणि ङ्गळझाडे यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

15 thoughts on “रोपवाटिका व्यवसाय (नर्सरी)”

  1. संजय भोसले

    सर मला नर्सरी रोपवाटिका सुरू करायची आहे माझ्या कडे जमिन असून मोठ्या रोड वर आहे मला सुरवाती पासून माहिती पाहिजे

  2. निश्च कोलते

    मला नर्सरी चालु करायची आहे. माझ्या जवळ 3000 स्केअर फुट जागा आहे.त्यामधे नर्सरी सुरुहोईल का व रोप कुठे मिळते ते कळवा ,मार्गदर्शन करा.

  3. Mahoday mala sinnar yethe rop vatika suru karaychi aahe tari mla tya vishayi mahiti aani margdarshan kuna kade milel yachi mahiti dyavi…..

  4. कमलेश अहिरराव

    सर कृपया मला रोप वाटिका विषयी माहिती हवी आहे.

  5. मला रोपवाटीका करायची आहे
    माहीती पाहीजे
    7350707118

  6. Nitin Sukenkar

    मला रोप वाटिका सुरु कराची आहे .मार्गदर्शन करा .

    .

  7. विशाल शेळके

    सर मला रोप वाटीका (नर्सरी) चालु करायची आहे
    मार्गदर्शन हवे आहे. 9970288212 रेोि

  8. राम लोखंडे

    मला रोप वाटिका कमित कमीत जागेत सुरु करायची आहे मार्गदर्शन करावे
    9424435076

  9. सचिन जाचक

    रोपवाटीकाची माहिती पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे

  10. मला सीताफल रोप वाटिका बनवाय ची आहे त्यासाठी मार्गदर्शन पाहिजे

  11. सुनिल कुंजीर

    मला रोपवाटीका व्यावसाय सुरु करायचा आहे़. तरी कृपया मला या व्यावसाया बद्दल माहिती व मार्गदर्शन करावे.

  12. मला रोपवाटिका बनवायचि आहे . तरि मला मारगदरशन करावे

  13. संदिप गणसिंग पाटिल

    मला स्वतःचा रोपवाटिका व्यवसाय सुरू करावयाचा आहे तरी मार्गदर्शन पाहिजे .

Leave a Comment