
मुंबई : मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांच्याकडून स्वाधीन क्षत्रिय यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाची त्यांनी सूत्रे स्वीकारली असून त्यांचा कार्यकाळ तब्बल अडीच वर्षांचा असेल. क्षत्रिय हे आतापर्यंत अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) होते.
राज्याच्या मुख्य सचिवपदी स्वाधीन क्षत्रिय
१९८०च्या बॅचचे क्षत्रिय हे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी असली तरी त्यांना उत्तम मराठी येते. ते एमए (राज्यशास्र) आणि पीएच.डी. आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे. राज्याच्या विविध विभागांमध्ये काम केल्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. जानेवारी २०१७पर्यंत क्षत्रिय हेच मुख्य सचिव राहणार असल्याने सध्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेले मेधा गाडगीळ, सुधीर श्रीवास्तव, के.पी. बक्षी, यूपीएस मदान, पी.एस. मीना यांच्यापैकी कोणालाही मुख्य सचिवपदाची संधी मिळणार नाही.
