भारताचे टेबल टेनिसमध्ये पदक निश्चित

kamal
ग्लासगो – टेबल टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या अंचता शरथ कमल आणि अँथोनी अर्पूर्थराजने अंतिम फेरीत धडक मारीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे एक पदक निश्चित केले आहे.

सिंगापूरच्या झी यांग- जे झॅन या जोडीचा अंचता – अँथोनी या जोडीने उपांत्यफेरीत ११-७, १२-१० आणि ११-३ या सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. सिंगापूरच्या एन. गॅवो आणि एच. ली या जोडीशी अंतिम फेरीत त्यांची लढत होणार आहे.

याआधी गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला कुस्तीमध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळाले होते. तर थाळीफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळाले होते. कुस्तीपटूंच्या कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, २० रौप्य आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

Leave a Comment