पासपोर्ट काढणाऱ्यांची वाचणार कटकट!

passport
मुंबई: पासपोर्ट काढणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम. पासपोर्ट काढण्यासाठी प्रक्रियेची कटकट आणि पोलिस स्टेशनमधील फेऱ्यांचे मुंबई पोलिसांनी जनतेच्या डोक्यावरचे हे ओझे पूर्णत: कमी केले असून आता महिनाभर पासपोर्टसाठी ताठकळत बसण्याची गरज नाही. मुंबई पोलिसांनी आता ऑनलाईन प्रक्रियेतही सुधारणा केली असून अवघ्या सात दिवसात अर्जदाराला पासपोर्ट मिळेल अशी सोय केल्याचे, पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

त्यांनी अर्जदारांचा पोलिस पडताळणीचा अहवालही आता ऑनलाइन पूर्ण केला जाणार असून यासाठी टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिस सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आल्याचे मारियांनी सांगितले.

इतकेच नाही तर आता पोलिस स्टेशनमधील पडताळणीसाठी अर्जदाराला एसएमएस द्वारे माहिती पाठवली जाणार आहे. अर्जदाराला या एसएमएसनंतर तीन दिवसांमध्ये संबंधित पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहावे लागेल.

यानंतर अर्जदाराची पोलीस पडताळणी होऊन, पासपोर्ट कार्यालयाकडे त्याचा अहवाल पाठवला जाईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे पासपोर्ट कार्यालयालाही हा अहवाल तात्काळ प्राप्त होईल.

सात दिवसांच्या आत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे अर्जदाराला सात ते दहा दिवसात पासपोर्ट उपलब्ध होईल, असे मारिया यांनी सांगितले.

Leave a Comment