एका रक्तचाचणीतून कळणार आत्महत्येची मनोवृत्ती !

sucied
लंडन – एखादी व्यक्ती तणावात असते ,ते आपल्यालाही जाणवते पण एक दिवस आत्महत्या केल्याचे समजताच आपल्याला धक्का बसतो मात्र आता आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच तणावात असणारी व्यक्ती त्या टोकाला जाण्यापूर्वीच आपण त्याला केवळ रक्तचाचणीतून वाचवू शकतो. विश्वास बसत नाही ना ;पण त्यावर संशोधन झाले आहे.

एखादी व्यक्ती दडपणाखाली, ताणतणावाखाली असेल तर त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात फरक पडतो. दिवसागणिक वाढणारा मानसिक ताण त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असतो. मात्र, असा विचार मनात येण्यासाठी शरीरातील जनुकीय बदल कारणीभूत असतात. शास्त्रज्ञांनी एसकेए२ नामक जनुकाचा अभ्यास केला असता त्यांना असे लक्षात आले की, आत्महत्या करणार्‍या व्यक्तींच्या रक्तातील या जनुकाचे प्रमाण कमालीचे कमी झाले होते. त्यामुळे भविष्यात आपण रक्तचाचणीद्वारे रक्तातील एसकेए२ चे प्रमाण तपासून संबंधित व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखू शकतो, असा विश्‍वास जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे प्राध्यापक झाचेरी कामिन्स्की यांनी व्यक्त केला आहे. काही व्यक्तींच्या शरीरात एसकेए२ जनुकाचे प्रमाण स्थिर असते; परंतु अशा व्यक्तींमध्ये या जनुकामधील मिथिलायझेशनची पातळी वाढलेली असते. यासाठी शास्त्रज्ञांनी जवळपास ३२५ व्यक्तींचा अभ्यास केला. या सर्व व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता किंवा तसा विचार त्यांच्या डोक्यात आला होता. या व्यक्तींच्या जनुकामधील मिथिलायझेशनची पातळी वाढलेली होती आणि हेदेखील रक्तचाचणीद्वारे समजल्यानंतर आपण त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखू शकतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रायोगिक चाचण्यांमध्ये त्यांना ९६ टक्के यश आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment