एअरमार्शल आर के एस भदुरिया ‘एनडीए’च्या कमांडंटपदी

rks
पुणे – एअर मार्शल आर के एस भदुरिया यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) नवे कमांडट म्हणून शुक्रवारी सूत्रे स्वीकारली.

एअर मार्शल आर के एस भदुरिया यांनी याच संस्थेतून शिक्षण घेतले असून ते 15 जून 1980ला वायुदलात रुजू झाले. एअर मार्शल आर के एस भदुरिया यांना लढाऊ आणि वाहतूक विमान उड्डाणांचा 4 हजार 200 तासांचा अनुभव आहे. त्यांनी जग्वार स्क्वाड्रन, फ्लाईट टेस्ट स्क्वाड्रनचे कमाडिंग ऑफिसर, हलक्या लढाऊ विमानविषयक प्रकल्पाचे संचालक म्हणून कार्य केले आहे. रशियात मॉस्को येथेही वायुदलाविषयक राजदूत-सहायक म्हणून ते कार्यरत होते. एनडीए’चे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते नवी दिल्ली येथे वायुदल-कर्मचारीविषयक प्रकल्पाचे उप-प्रमुख होते. अतुलनीय सेवेबद्दल 2002 मध्ये भदुरिया यांना वायुसेना-पदक, तर 2013 मध्ये अतिविशिष्ट सेवापदक देउन गौरवण्यात आले आहे.

Leave a Comment