‘अल कायदा’ला युरोपमधून आर्थिक पाठबळ

al-kayda
वॉशिंग्टन : जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी अल कायदा संघटनेला युरोपियन सरकार आणि उद्योजक सर्वात मोठे आर्थिक स्रोत ठरत असल्याचा धक्कादायक खुलासा एका माध्यम अहवालातून करण्यात आला आहे.

अपहृत अधिकारी, नेत्यांची सुटका करून घेण्यासाठी युरोपियन देशांच्या सरकारांनी अल कायदा दहशतवाद्यांना गेल्या ६ वर्षांत ७५२ कोटी रुपये दिले. अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने जाहीर केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, केवळ २0१३ या एका वर्षातच युरोपियन देशांच्या सरकारने आपापल्या उद्योजक, नेते, अधिकार्‍यांची सुटका करून घेण्यासाठी ६.६ कोटी अमेरिकी डॉलर्स एवढी खंडणी दिली. अपहृत प्रत्येक व्यक्तीच्या सुटकेसाठी सद्यस्थितीला १ कोटी डॉलरपर्यंत दिले जात आहेत. अशाच प्रकारे २00८ पासून युरोपियन राष्ट्रांनी अल कायदा दहशतवाद्यांना १२५ दशलक्ष अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास ४00 कोटी रुपये दिले.

Leave a Comment