अजूनही सुरु आहे माळीणच्या ढिगा-यात जिवांचा शोध

malin1
पुणे : अख्ख्या गावावर डोंगर कोसळल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली गुरुवारी रात्रीपर्यंत ४४ मृतदेह सापडले असून अद्यापही २०० ग्रामस्थ चिखलाच्या राडारोड्याखाली अडकले असण्याची भीती असून, या जिवांचा ढिगाऱ्याखाली शोध घेणे सुरूच आहे.

डोंगराची महाकाय दरड माळीणवर बुधवारी सकाळी कोसळल्यानंतर दोन तासांच्या आतच मदतकार्य सुरू झाले. मात्र, मदतकार्यात प्रचंड पावसामुळे अडचणी येत होत्या. रात्रभर सर्चलाईटच्या प्रकाशात चिखलाचे ढिगारे उपसण्यात येत होते. मात्र, रात्रभरात केवळ तीनच मृतदेह सापडू शकले. आज सकाळपासून काम आणखी वेगाने सुरू झाले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण चिखल हटविण्यास किमान पाच ते सहा दिवस लागू शकतात. त्यानंतरच मृतांचा निश्चित आकडा कळू शकणार आहे.

Leave a Comment