शेवटच्या दिवशी सामना वाचवणे एक मोठे आव्हान – धवन

shikhar-dhawan
लंडन – भारताचा सलामीवीर शिखर धवनने भारताची इंग्लंड विरुध्द तिस-या कसोटी सामन्यात नाजूक स्थितीत असून, शेवटच्या दिवशी सामना वाचवणे एक मोठे आव्हान असल्याचे मान्य केले.

आमच्यासाठी गुरुवारचा दिवस खडतर ठरु शकतो. इंग्लंड चांगल्या स्थितीत आहे. आमच्या चांगल्या भागीदा-या झाल्या तर, सामना वाचवता येईल असे धवनने म्हटले आहे.

खेळपट्टीचा नूर बदलू लागल्यामुळे फलंदाजी करणे कठीण होत चालले आहे. खेळपट्टीला तडे गेल्यामुळे चेंडूचा नेमका अंदाज बांधणे कठीण होत आहे. त्यामुळे अशा खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही असे धवन म्हणाला.

इंग्लंडने विजयासाठी ४४५ धावांचे लक्ष्य दिले असून, भारताच्या सध्या चार बाद ११२ धावा झाल्या आहेत. इंग्लंड दौ-यात धावांसाठी झग़डणारा धवन दुस-या डावात ३७ धावांवर बाद झाला. प्रथमच मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचे मोठया खेळीमध्ये रुपांतर करण्यात त्याला अपयश आले.

Leave a Comment