
रत्नागिरी- कंटेनर एका मॅक्सिमो गाडीवर पडल्याने मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटातील वळणावर तिघांचा मृत्यू झाला.
वेरळ घाटातील वळणावर अपघात, तीन ठार
गुरुवारी एक कंटेनर एका मॅक्सिमो गाडीवर मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात पलटी झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून काहीजण कंटेनरखाली दबल्याची शक्यता आहे. या अपघातात मॅक्सिमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या कंटेनर चालकाचे परशुराम मंदिर थांब्याजवळील एका अवघड वळणावर वेगावर नियंत्रण न राहिल्याने दुचाकीला ओव्हरटेक करताना या कंटेनरने दुचाकीला चिरडले होते. यात दुचाकीस्वार सुरेश गोरे यांचा मृत्यू झाला. या अपघाताआधी येथे दोन दिवसांपूर्वी मिनरल वॉटरच्या बाटल्या मुंबईहून गोव्याच्या दिशेने वाहून नेणारा मालवाहू ट्रक पहाटे ४.३० वाजता उलटला होता.
