बोल्ट एक्सप्रेसचे वादाला निमंत्रण

bolt
ग्लासगो – 100 मीटर्स व 200 मीटर्समध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी जमैकन सुपरस्टार स्प्रिन्टर युसेन बोल्ट मैदानात उतरला नसला तरी त्याने आता एका वेगळय़ाच वादाला निमंत्रण दिले आहे. यंदाच्या ग्लास्गो स्पर्धेपेक्षा ऑलिम्पिक स्पर्धा दर्जेदार होती, अशा आशयाचे वादग्रस्त वक्तव्य त्याने अलीकडेच केले असल्याची सध्या चर्चा आहे.

सदर वक्तव्य त्याने ऍथलिट्स व्हिलेजमध्ये केल्याचे मानले जाते. त्याच्याकडून नव्या वादाला निमंत्रण प्रिन्स हॅरीच्या भेटीदरम्यान मिळाले, असे सांगितले जाते. रॉयल ट्रियो व जमैकन स्प्रिन्ट स्टारची मंगळवारी भेट झाली, त्यावेळी त्यांची छबी टिपण्यासाठी मोठी गर्दी देखील जमली होती. या छोटय़ाशा भेटीनंतर बोल्ट रवाना झाला.

Leave a Comment