दरड कोसळल्याने फोंडाघाटात वाहतूक खंडित

lanslide
फोंडाघाट – संततधार कोसळणा-या पावसामुळे फोंडाघाटामध्ये पुन्हा एकदा रात्री १० च्या सुमारास दरड कोसळल्याने सुमारे ८ ते ९ तास वाहतूक खंडित झाली. त्यामुळे दूध, बेकरी उत्पादने, जिल्हय़ात विक्री करणा-या गाडय़ा मागे जाऊन वैभववाडी मार्गे जिल्ह्यात दाखल झाल्या.

घटनेचे गांभीर्य ओळखून बांधकाम खात्याचे अधिकारी कन्नादासन, तहसिलदार घारे, पो.नि. रानमाळी आणि फोंडाघाट हेल्थ अ‍ॅकॅडमीचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेली दरड बाजूला करून एकेरी मार्ग सुरू करण्यात आला. मात्र पूर्ण वाहतूक सुरळीत व्हायला सकाळचे सात वाजले.

सतत कोसळणारा पाऊस, खाली येणारे दगड माती, थंडी यामुळे मदत कार्यात रात्री अडथळे येत होते. त्यावेळी आलेल्या दोन जेसीबींनी रस्त्यावर आलेली दरड, मोठाले दगड, माती, झाडी-झुडपे कडेला घेऊन एकेरी मार्ग सुरू केला.

Leave a Comment