क्लासिक टेनिस स्पर्धेच्या दुस-या फेरीत इव्हानोव्हिक, व्हीनस

venua
स्टॅनफोर्ड – येथे सुरू असलेल्या स्टॅनफोर्ड ओपन बँक ऑफ क्लासिक टेनिस स्पर्धेत नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणा-या सर्बियाच्या ऍना इव्हानोव्हिकने तसेच अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने विजयी सलामी दिली असून जर्मनीची माजी अग्रमानांकित सबाइन लिसिस्कीने डब्लूटीए टूरवरील सर्वात वेगवान सर्व्हिस करण्याचा विक्रम नोंदवला असला तरीही तिला पराभव पत्करावा लागला.

जर्मनीच्या लिसिस्कीवर पाचवी मानांकित इव्हानोव्हिकने 7-6 (7-2), 6-1 अशी मात केली. याआधी या दोघी विम्बल्डन स्पर्धेत आमने सामने आल्या होत्या, त्यावेळी लिसिस्कीने इव्हानोव्हिकवर तीन सेट्समध्ये मात केली होती. या सामन्यावेळी लिसिस्कीने महिला टेनिसमधील सर्वात वेगवान सर्व्हिस करण्याचा नवा विक्रम नोंदवला. तिने 210.8 किलोमीटर्स प्रतितास वेगाची सर्व्हिस नोंदवली. या सर्व्हिसला इव्हानोव्हिकने परतवण्याचा प्रयत्न केला. चेंडूपर्यंत तिने रॅकेट नेली होती. पण लिसिस्कीला त्यावर गुण मिळाला. यापूर्वी अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने 2007 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत 207.6 किलोमीटर्स प्रतितास वेगात सर्व्हिस करण्याचा विक्रम केला होता. इव्हानोव्हिक देजा पेट्रोव्हिक यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

पात्रता फेरीतून आलेल्या पॉला कॅनियाचा व्हीनसने 6-3, 6-2 असा पराभव केला. आता तिची पुढची लढत चौथ्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काशी होईल. यानिना विकमेयरने दुसऱया सेटमध्ये माघार घेतल्याने कॅरेल झाओला विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेची विद्यमान विजेती डॉमिनिका सिबुल्कोव्हाचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. तिला स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने 6-2, 4-6, 6-2 असे हरविले.

Leave a Comment