मशिदींवरील विनापरवाना भोंग्यांवर कारवाई

loudspeaker
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील ४५ मशिदींवरील विनापरवाना भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून ही कारवाई शांतता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात येणार आहे.

लाऊड स्पीकरला रात्री १० ते पहाटे ५ यावेळेत बंदी आहे. तरीही नवी मुंबईतील मशिदींवरील भोंगे पहाटे ५ वाजता नमाजाची बांग देतात. त्यामुळे आसपासच्या लोकांची झोपमोड होते.

याबाबत न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचलग यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या विनापरवाना भोंग्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment