दोन हजारांनी स्वस्त झाले मोटो जी स्मार्टफोन

moto
मुंबई – भारतात आपल्या मोटो जी स्मार्टफोनच्या किंमतीत मोटोरोला कंपनीने दोन हजार रुपयांनी घट केली आहे.

या स्मार्टफोनला लाँचनंतर मोठा प्रतिसाद मिळाला होता. यासाठी या मोबाईलची विक्री वाढवण्यासाठी किंमतीत घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोटो जीच्या आठ जीबी स्मार्टफोनची किंमत १० हजार ४९९ रुपयांपर्यंत कमी कऱण्यात आली आहे. तर १६ जीबी साठीची किंमत कंपनीने ११ हजार ९९९ इतकी कमी केली आहे. ही ऑफर काही मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या फ्लिपकार्टवर मोटो जी स्मार्टफोन्सची विक्री सुरु आहे.

Leave a Comment