30 कोटी पार एअरटेलच्या ग्राहकांची संख्या

airtel
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी दूरसंचार म्हणून ख्याती प्राप्त कंपनी एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 30 कोटीच्या पुढे गेली असून हा आकडा मोबाइल फोन, फिक्स्ड लाइन, डीएसएल आणि डीटीएच सेवांसाठीचा आहे. 1995 मध्ये एअरटेलने आपला व्यवसाय सुरू केला होता. 2009 मध्ये कंपनीने 10 कोटी आणि 2012 मध्ये 20 कोटी ग्राहकांचा आकडा पार केला होता.

10 कोटी नवे ग्राहक कंपनीसोबत मागील 2 वर्षांपेक्षा देखील कमी वेळात जोडले गेले आहेत. यानंतर कंपनी जगातील चौथी सर्वात मोठी आणि चीनबाहेर दूसरी सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदात कंपनी बनल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनी आशिया आणि आफ्रिकेच्या 20 देशांमध्ये आपली सेवा देत आहे.

हा आकडा कंपनीच्या मजबूत व्यवसायाचे प्रदर्शन करतो जागतिक स्तरावर ही सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी असल्याचे भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले आहे.

Leave a Comment