शस्त्रसंधीकडे दुर्लक्ष ;गाझामधील संघर्ष आणखी तीव्र

gaza
गाझा/जेरूसलेम – आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेल्या शस्त्रसंधीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून इस्रायल आणि हमास यांनी मंगळवारी गाझा पट्टीतील संघर्ष आणखी तीव्र केला आहे.

पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरू केले आहेत. या भागातील लोकांनी आपली घरे रिकामी करावीत, असा इशाराही देण्यात आला आहे. गाझावर नियंत्रण असलेल्या हमास संघटनेला इस्रायलने लक्ष केले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत गाझातील वीज निर्मिती प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. इस्रायली विमानांनी हमासचा गाझामधील वरिष्ठ नेता इस्माइल हनिया याच्या घरालाही टार्गेट केले आहे. गाझा पट्टीत तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १ हजार ८८ पॅलिस्टिनी नागरिक ठार झाले आहेत, तर ६ हजार ४७० नागरिक जखमी झाले आहेत. एक हजार ८८ पॅलेस्टिनी; तसेच ५६ इस्रायली नागरिक ठार झाले आहेत.

Leave a Comment