गाझापट्टीतील नागरिक अंधारात; वीज प्रकल्पावर बॉम्बवर्षाव

gaza1
गाझा – इस्त्रायली सैन्याने गाझापट्टीतील ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केल्याने गाझापट्टीतील नागरिकांवर आता अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. गाझातील वीज प्रकल्पातील इंधनाच्या टाकीवर जोरदार बॉम्बवर्षाव करण्यात आला.

वीज वितरण कंपनीचे प्रवक्ते जमाल दरदासावी म्हणाले की, इंधन साठवणुकीच्या तीन टाक्यांवर हे बॉम्ब पडले आहेत. सध्या गाझापट्टीतील नागरिकांना दिवसांतून तीनच तास वीज मिळते. आता हा प्रकल्प उद्ध्वस्त झाल्यानंतर तीही मिळणे दुरापास्त होणार आहे.या वीज प्रकल्पावर हमासचा ताबा होता. तो मिळवण्यासाठीच इस्रयलने अंदाधुंद हल्ला या टाक्यांवर केला.इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी टीव्हीवर दिलेल्या भाषणानंतर इस्त्रायली सैन्याचे हल्ले अधिक तीव्र झाले. हमासचा नेता इस्माइल हनीयेच याचे घर आणि सरकारी कार्यालय बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. आमची घरे जरी उद्ध्वस्त झाली तरी आमचे धैर्य कमी होणार नाही, असे हनीयेचने स्पष्ट केले.इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात १११० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.

Leave a Comment