आयसीसीकडून मोईन अलीची कानउघडणी

moeen-ali
साउथम्पटन : इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीची आयसीसीने गाझा पट्टीतील लोकांना पाठिंबा दर्शवणारा बँड हातावर बांधल्याबद्दल कानउघडणी केली आहे. उर्वरित कसोटीत बँड बांधून खेळू नये, असे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी त्याला बजावले आहे. यापुढे त्याने बँड बांधल्यास कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

अलीने सोमवारी पहिल्या डावात ‘गाझाला वाचवा’ तसेच ‘पॅलेस्टाइन मुक्त करा’ असे छापलेला बँड हातावर बांधून फलंदाजी केली. इंग्लंड बोर्डाने त्याला हरकत घेतली नसली तरी आयसीसीने त्याच्या पाठिंब्याची गंभीर दखल घेतली.

२७ वर्षीय अली हा बर्मिगहॅममध्ये जन्माला आला मुस्लिम असून त्याचे पाकिस्तानशी नाते आहे. दरम्यान, अलीच्या कृतीला पाकिस्तान आणि पाकिस्तान वंशाच्या माजी क्रिकेटपटूंनी पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Comment