`पर ड्रॉप, मोअर क्रॉप’चे मोदींचे उद्दीष्ट

modi
नवी दिल्ली : उदेशातील कृषी शास्त्रज्ञांनी पलब्ध मर्यादित स्रोतातूनच शेतीची उपज क्षमता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्य करावे तसेच पारंपरिक कृषी ज्ञान आणि आधुनिक संशोधनाची जोड निर्माण करावी. आज देशाला पाण्यासाठीही स्वतंत्रपण सिंचन आणि साठवण क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. संशोधित कृषी ज्ञान शेतक-याच्या बांधापर्यंत पोहोचवावे, यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत आणि कमीत कमी पाण्यात अधिकाधिक धान्य निर्मिती होण्यासाठी आता `पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ हे उद्दीष्ट घेऊन कार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च (भारतीय कृषीविज्ञान संशोधन परिषद आयसीएआर) च्या 86 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना पाण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी `पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ या अभियानाची सिद्धता करावी, असेही आवाहन केले आहे. देशाची आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी याशिवाय अन्य पर्याय नाही. पिकांची उत्पादकता वाढवताना गुणवत्तेकडी लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे कृषीजमीन चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या देशाची गरज भागून जगालाही अन्नधान्य पुरवठय़ात आपण अग्रेसर राहू याच दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. याचबरोबर आपला शेतकरीही अधिक श्रीमंत होण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे, असे मतही व्यक्त केले.