नायजेरियाची वेटलिफ्टर डोपिंगमध्ये दोषी

doping
ग्लासगो – उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत (डोपिंग) नायजेरियाची १६ वर्षीय वेटलिफ्टर चिका अमलाहा दोषी ठरली असून चिकाने शुक्रवारी महिलांच्या ५३ किलो गटात १९६ किलो वजन उचलताना सुवर्णपदक पटकावले होते.

प्रतिबंधक द्रव्य सेवनप्रकरणी ‘बी सँपल’मध्ये दोषी ठरल्याने चिकावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अमलाहा दोषी ठरल्याने भारताच्या खात्यात आणखी एक भर पडणार आहे. चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या स्वाती सिंगला आता कांस्यपदक मिळू शकेल.

Leave a Comment