संगमेश्वरची राजवाडी

rajwadi
मुंबई-गोवा महामार्गावर गोळवली टप्पा येथून आतमध्ये २ किमी अंतरावर राजवाडी हे गाव असून येथे असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांसह एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही राजवाडी हे गाव ओळखले जाते. येथे गरम पाण्याची दोन कुंडे असून वैशिष्टय़ म्हणजे येथील सर्व परिसर स्वच्छ आहे. राजवाडी गावामध्ये गाडी थांबवून ५ मिनिटांचे अंतर चालत गेल्यावर गरम पाण्याच्या कुंडांवर पोहोचता येते. येथील कुंडाजवळच प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती आणि सभामंडपातील काष्ठकला अप्रतिम आहे. राजवाडी गावाजवळच ‘भवानगड’ आहे. या गडावर पोहोचण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. भवानगडावर भवानी मातेचे मंदिर असून तीन फूट महामार्गावरून थोडीशी वाकडी वाट करून राजवाडी गरम पाण्याची कुंडे आणि सोमेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.

जवळचे रेल्वे स्टेशन: संगमेश्वर रोड- अंतर ४ किमी
जवळचे बस स्टेशन: संगमेश्वर- ७ किमी
खवय्यांना इथले थालीपीठ, झुणका भाकर, वडे, संगमेश्वरी मटण खूप आवडते. त्यामुळे याची चव नक्की चाखावी.

Leave a Comment