वेबसाईटसाठी आता हिंदी,मराठीतही डोमेन

domainयेत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजे १५ ऑगस्टपासून ज्यांना स्वतःची वेबसाईट सुरू करायची आहे ते हिंदी, मराठी मध्येही त्यांचे डोमेन रजिस्टर करू शकणार आहेत. वेबसाईटसाठी डोमेन नोंदविताना आजपर्यंत इंग्रजी भाषेत नोंदविणे बंधनकारक होते आता देवनागरी लिपीतही डोमेन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या निर्णयाला उच्चस्तरीय मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे असेही समजते.

या विषयी अधिक माहिती देताना नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियाचे सीएफओ गोविंद म्हणाले की सध्या पहिले दोन महिने ही सुविधा ट्रेडमार्क, कॉपीराईट नावांचा समावेश असलेल्या सरकारी संस्था, व्यावसायिक फर्म, ब्रँड यांना दिली जाणार आहे. डोमेन च्या नोंदणीसाठी ३५० रू. शुल्क आकारले जाणार आहे. सब डोमेनसाठी हा दर २५० रूपये आहे. दोन महिन्यांनंतर सर्वासाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या वेबसाईटसाठी टॉप लेव्हल डोमेन भारत हेच असेल असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment