रशियाचा उपग्रह कोसळण्याची शक्यता

russia
अंतराळात वजनरहित अवस्थेत पाली, नाकतोडे आणि अळंब्या यांच्यातील सेक्स जीवन व्यवहार कसे होतात तसेच अन्य जैव वैज्ञानिक संशोधनासाठी रशियाने अंतराळात सोडलेला फोटोन एम चार हा उपग्रह पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या उपग्रहाचा जमिनीवरील रशियन स्पेस स्टेशनशी असलेला संपर्क तुटला असून हा उपग्रह ग्राऊंड कंट्रोलला प्रतिक्रिया देत नसल्याचे सांगितले जात आहे.

हा उपग्रह १९ जुलै रोजी लाँच केला गेला आहे. तो चार महिने अंतराळात राहू शकणार आहे.रशिया इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिको बायोलोजीचे ओलेग वोलोशिन यांचा हा उपग्रह सोडण्यात सहभाग होता. ते म्हणाले की गेकोज पाली अंतराळात कसे वर्तन करतात याची निरीक्षणे आम्हाला करायची आहेत. सध्या या उपग्रहाशी संपर्क साधण्यात अडचण निर्माण झाली आहे. सहा टनी वजनाचा हा उपग्रह दीर्घकाळ अंतराळात राहू शकेल मात्र त्यात निर्माण झालेला प्रॉब्लेम निपटता आला नाही तर मात्र तो पृथ्वीवर कोसळेल.

Leave a Comment