पावसाळी प्रवाहाचे मोठे स्रोत, देवघर

deoghar
पावसाळी आणि कृषी पर्यटनासाठी देवरूख रत्नागिरी मार्गावरील कर्ली फाटय़ावरून देवघर या गावाकडे जाता येते. गिरीष आणि आनंद बोंद्रे या बंधूनी येथील पर्यटन विकसित केले असून गावाता पावसाळी प्रवाहाचे मोठे स्रोत, प्रचंड आकाराच्या शिळा, असंख्य जातीचे पक्षी, जुने महाकाय वृक्ष पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. अत्यंत शांत व रम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवघरला राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पर्यटक खरी शांतता अनुभवायला येत असतात. येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था सर्व सुखसोयींनी युक्त परंतु १०५ वर्षांपूर्वीच्या घरामध्ये केली जाते. पर्यटक सांगतील तो पदार्थ त्यांना आवडीनुसार करून दिला जातो.

जवळचे रेल्वे स्टेशन: संगमेश्वर रोड- अंतर २५ किमी
जवळचे बस स्टेशन: देवरूख- अंतर १० किमी

Leave a Comment