पर्यटक व पांथस्थांसाठी मोठा आधार, आरवली

aravali
पावसात चिंब भिजल्यानंतर जसे गरम पदार्थ हवेहवेसे वाटतात तसं गरम पाण्याची आंघोळही हवीशी वाटते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजवाडीनंतर आरवली येथील गरम पाण्याची कुंडेही पावसाळ्यात महामार्गावरील पर्यटक व पांथस्थांसाठी मोठा आधार ठरत आहेत. गरम पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असलेले आरवली येथील हे प्रसिद्ध ठिकाण मोठय़ा पुलाजवळ महामार्गालगत आहे. महामार्गावर बाजूला गाडी थांबवून येथील गरम पाण्याच्या कुंडावर जाता येते. कुंडांच्या जवळच कपडे बदलण्यासाठी खोल्या केलेल्या असल्याने पर्यटकांची मोठी सोय झालेली आहे. गंधकमिश्रित गरम पाण्यात अंघोळ केल्यावर लगेचच खूप भूक लागते. त्यामुळे अधिक वेळ आंघोळ केल्यास चक्कर येण्याची शक्यता असते हे पर्यटकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

जवळचं रेल्वेस्टेशन: आरवली रोड- अंतर २ किमी
जवळचं बसस्टेशन:आरवली- अंतर २०० मीटर
खाण्यासाठी: विविध प्रकारचे मासे

Leave a Comment