डिझेलवर १८,९00 कोटी खर्च; रेल्वेचा विद्युतीकरणावर भर

railway
नवी दिल्ली : डिझेल महागल्यामुळे रेल्वेच्या इंधनावरील खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे चिंतातूर झालेल्या रेल्वेने विद्युतीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेल महागल्याने चालू आर्थिक वर्षात रेल्वेच्या इंधन खर्चात साडेसहा हजार कोटी रुपये वाढ होण्याचा अंदाज आहे.

रेल्वे बोर्डाचे सदस्य (वीज) कुलभूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी रेल्वेला इंधनासाठी एकूण २८,५00 कोटी रुपये खर्च झाला होता. यात ९६00 कोटी रुपये विजेवरील तर १८,९00 कोटी डिझेलवरील खर्चाचा समावेश आहे. डिझेलवरील खर्चात वाढ होण्याचे प्रमुख कारण डिझेलची दरमहा होणारी दरवाढ आहे. यामुळे यंदा संपूर्ण वर्षात रेल्वेचा इंधनावरील खर्च ३५ हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. रेल्वेने विद्युतीकरण केले तर या खर्चात कपात होऊ शकते. म्हणून रेल्वेने विद्युतीकरण प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेल्वे लाइनची एकूण लांबी ६५ हजार किमी आहे. यातील ३२ टक्के रेल्वे लाइनचे म्हणजे २१ हजार किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण झाले आहे. सध्या दरवर्षी ५00 ते ६00 किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण केले जात आहे.

Leave a Comment