गाझाचे समर्थन; मोईन अलीच्या येणार अंगलट

moean
साउथम्पटन – इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीने भारताविरुद्धच्या तिस-या कसोटीत गाझा आणि पॅलेस्टाइनचे समर्थन केल्याने अंगलट येणार असून आयसीसीने अलीविरोधात चौकशी समिती नेमली असून आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

इंग्लंडचा खेळाडू मोईन अली हा हातात एक बँड घालून साउथम्पटन येथे सुरु असलेल्या कसोटीच्या दुस-या दिवशी मैदानात उतरला होता. या बँडवर सेव्ह गाझा, फ्री पॅलेस्टाइन असा संदेश लिहीण्यात आला होता. आयसीसीच्या नियमानुसार कोणताही खेळाडू आयसीसीची परवानगी घेतल्याशिवाय संदेश देणारे बँड, कपडे किंवा अन्य कोणत्याही वस्तू घेऊन मैदानात उतरु शकत नाही. मोईन अलीने पॅलेस्टाइनला स्वतंत्र करण्याची मागणी करणारा बँड घालताना आयसीसी किंवा इंग्लंड क्रिकेट बोर्डाची परवानगी घेतली नव्हती. मैदानात कोणताही खेळाडू राजकीय, धार्मिक आणि वंशभेदाशी संबंधीत संदेश देऊ शकत नाही असेही आयसीसीच्या आचारसंहितेमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आयसीसीने या घटनेची गंभीर दखल घेत अलीविरोधात चौकशी समिती नेमली आहे.

Leave a Comment