‘कोयना’चे मजबुतीकरण तपासणारे निम्मी उपकरणे बंद !

koyna
सातारा : कोयना धरणाच्या भिंतींची मजबुती तपासणारे उपकरणांची स्थिती खराब असल्याची वस्तुस्थिती असून निम्म्याहून अधिक उपकरणे बंद असल्याची माहिती चव्हाट्यावर आली आहे.

धरणाबाबत धक्कादायक गोपनिय अहवाल धरण सुरक्षित संघटना ‘मेरी’ नाशिक या संस्थेने शासन व कोयना प्रकल्पाला वर्षापूर्वी दिला आहे. त्यात म्हटले आहे कि कोयना धरणाच्या भिंतीमध्ये धरणाची मजबुती तपासण्यासाठी बसविण्यात आलेल्या उपकरणापैकी ५0 टक्के उपकरणे बंद आहेत. कोयना धरण भरत असताना त्याची प्रकृती उत्तम स्थितीत असणे गरजेचे असल्याचे या अहवालात नमूद केले असताना याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

१0५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणाच्या उभारणीवेळी धरणाची सुस्थिती तपासण्यासाठी व धरणाची वेळोवेळी प्रकृती समजण्यासाठी धरणाच्या भिंतीमध्ये २९६ विविध तपासणी घेणारी उपकरणे बसविण्यात आली आहेत. यामध्ये थर्मामिटर, ट्रेसमिटर, स्ट्रेनमिटर, पिझोमिटर, टिल्टमिटर, डायलओझस, भूकंपमापन आदि विविध उपकरणाचा समावेश आहे. कोयना धरणाची प्रकृती सुस्थितीत आहे का? हे पाहण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. या सर्व उपकरणाची व कोयना धरणाची तपासणी धरण सुरक्षित संघटना ‘मेरी’ नाशिक यांच्याकडून दर सहा महिन्याला करून धरण सुस्थितीत असल्याचा अहवाल शासनासह कोयना प्रकल्पाला देवून त्यावर उपाययोजना सुचविण्याचे काम करते.मात्र वर्षापूर्वी दिलेल्या अहवालावर कार्यवाही झालेली नाही.

Leave a Comment