उ.कोरियाची व्हाईट हाऊस, पेंटॅर्गानवर अण्वस्त्र हल्याची धमकी

koria
सोल – उत्तर कोरियाचे मिलिट्री जनरल पॉलिटिकल ब्युरोचे संचालक ह्यांग प्योग सो यांनी अमेरिकेने कोरियातील ढवळाढवळ थांबविली नाही तर व्हाईट हाऊस आणि पेंटेगॉनवर अण्वस्त्र हल्ले करण्याची धमकी दिली आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तण कोरियातील तणाव वाढविण्यास अमेरिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात १९५० ते ५३ या काळात झालेल्या युद्धाच्या ६१ व्या वर्धापन दिनामिमित्त झालेल्या भाषणात ही धमकी दिली गेली असून हे भाषण दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केले गेले आहे.

आमच्या सार्वभौमत्वाला धोका देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. दक्षिण कोरियाबरोबर अमेरिकेने केलेल्या लष्करी सरावात अण्वस्त्रे वाहून नेणार्‍या विमानांचा वापर केला गेला आहे व त्यामुळे सीमाभागात तणाव वाढला आहे असाही आरोप सो यांनी केला आहे. १९५० ते ५३ या काळात दक्षिण व उत्तर कोरियात झालेल्या युद्धात दक्षिण कोरियाला अमेरिकेचा पाठिंबा होता तर उत्तर कोरियाला रशियाचा पाठिंबा होता.

Leave a Comment