आणखी स्वस्त होणार विमान प्रवास

aeroplane
मुंबई – देशी विमान कंपन्यांनी यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 12 वेळा प्रवासभाडय़ात कपात केल्यामुळे 30-75 टक्के प्रवासभाडे स्वस्त झाले असून नव्या कंपन्या आल्यामुळे प्रवासभाडय़ात सरासरी 40 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे.

स्पाइसजेटने जानेवारीमध्ये प्रवासभाडे कमी करण्याची सुरवात केली आणि प्रत्येकवेळी कपातीचे नेतृत्व केले आहे, ज्यागोष्टीचे नंतर सर्वांनी अनुकरण केले असून 12 जूनला टाटा समूहाची भागीदारी असणारी कंपनी एअरएशियाचा प्रारंभिक 1 रुपयांच्या तिकिट योजनेमुळे स्वस्त प्रवास दर देण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

आधी तिकिट घेणे फायदेशीर एअरलाइन्स विशेष योजनेतंर्गत प्रवासभाडय़ाची घोषणा करतात. ज्यात प्रवासाची तारीख साधारणपणे 2 किंवा 3 महिन्यानंतरची असते. अशा परिस्थितीत अंतिम वेळी त्यांच्याकडे रिकाम्या सीटसची संख्या अत्यंत कमी राहते, ज्यावर कंपन्या तिकिट दरात कपात करत नाहीत.

Leave a Comment