अनिल अंबानी खरेदी करणार जेपी ग्रुपचे हायड्रोपॉवर प्रकल्प

anil-ambani
नवी दिल्ली : जेपी ग्रुपचा पूर्ण हायड्रोपॉवर उद्योग 12000 कोटी रुपयांमध्ये अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर खरेदी करू इच्छिते. कंपनीने यासाठी प्रारंभिक करारदेखील केला असून दूरसंचार नंतर हा देशाच्या पायाभूत क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार असू शकतो.

या व्यवहाराच्या शर्यतीत अनिल अंबानी ग्रुपने अदानी आणि जेएसडब्ल्यू ग्रुपला मागे टाकले आहे. आर पॉवरने यासाठीच्या एमओयूवर स्वाक्षरी केली आहे. जेपी ग्रुपकडे 1800 मेगावॅटचा हायड्रोपॉवर पोर्टफोलिओ आहे. रिलायन्स पॉवर आपली उप कंपनी रिलायन्स क्लीनजेनच्या द्वारे जेपी ग्रुपचे तिन्ही हायड्रोपॉवर प्रकल्प खरेदी करू इच्छिते. सध्या रिलायन्स पॉवरकडे फक्त औष्णिक उर्जा प्रकल्प आहेत. जेपी ग्रुपचे हे प्रकल्प कार्यान्वित आहेत ,त्यामुळे यात मोठी जोखीम नाही.

Leave a Comment