सिरीयात आयएसआयएसचा मॅरेज ब्युरो

isis
इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड सिरीया या जिहादी संघटनेने या संघटनेतील योध्दांची लग्ने व्हावीत यासाठी मॅरेज ब्युरो सुरू केला असल्याचे वृत्त आहे.या मॅरेज ब्युरोत जिहादींशी लग्न करण्यास तयार असलेल्या तरूण महिला तसेच विधवाही आपली नावे नोदवू शकणार आहेत. या संघटेनेने ताब्यात घेतलेल्या अलबाब शहरात असा ब्युरो सुरू केला गेला आहे.

येथे नांव नोंदविणार्‍या महिलांनी त्यांची नांवे आणि पत्ता नोंद करायचा आहे. त्यानुसार या संघटनेचे लोक त्यांच्या पत्त्यावर जाऊन तेथे या महिलांची पूर्ण चौकशी करणार आहेत. त्यानंतर या संघटनेतील सदस्यांना ज्या मुली योग्य वाटतील त्यांना मागणी घातली जाणार आहे. आजपर्यंत हे जिहादी जबरदस्तीने महिलांना विवाह करण्यास भाग पाडत असल्याच्या बातम्या येत होत्या. या संघटनेने अगोदरच महिलांवर अनेक बंधने लागू केली आहेत.