सावधान … येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टी

high-tied
मुंबई – मुंबईत महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, कारण हवामान विभागाने येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या विभागीय केंद्राने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करताना मुंबईला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल झाले असून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मुंबईत येत्या २४ तासांत ७ ते १४ सेंटीमीटर पाऊस कोसळेल तर हेच प्रमाण ठाणे जिल्ह्यासह कोकणात २४ सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतो. गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ४८.३ मिलीमीटर तर कुलाब्यात २६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Comment